छ. संभाजीनगर - उंडणगाव येथे विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल, (हिं.स.) उंडणगाव येथील एका २५ वर्षीय विवाहितेने शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उंडणगाव शिवारातील गट न
छ. संभाजीनगर - उंडणगाव येथे विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या


छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल, (हिं.स.) उंडणगाव येथील एका २५ वर्षीय विवाहितेने शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उंडणगाव शिवारातील गट नंबर २८५ मधील शेतात कुटुंबीय वास्तव्यास आहे. अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले.

त्यांना तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी घाटी पोलिस चौकीचे कर्मचारी ए. एच. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून अजिंठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मृत यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande