
नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस स्टेशनच्याहद्दीतील नरसी ते शंकर नगर रोडवरील राजबार आणि रेस्टॉरंट येथे बिलोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम सुदाम पानेगावकर यांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून 06 पीडित महिलांची सुटका केली. तर दोन आरोपींना अटक केली आहे. येथे महिलांची देह विक्रीचा व्यवसाय पहिल्या मजल्यावर खोली मध्ये चालू असल्याच्या गोपनीय माहितीची खात्री करूनच उपविभागीय अधिकारी पानेगावकर यांनी नायगाव पोलिसांच्या मदतीने धाड टाकून रामतीर्थ पोलिसांना धक्का तंत्राला बळी पडावे लागले. या दुष्कृत्याबाबत या दोन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली सहा पिढीत महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे आरोपींवर PITA कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर व त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis