ट्रम्प यांची इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा
वॉशिंग्टन , 08 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत सांगितले आहे की, इराणवर होऊ शकणारे संभाव्य हल्ले आणि बॉम्बहल्ले सध्या दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की हा ‘दोन्ही बाजूं
ट्रम्प यांची इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा


वॉशिंग्टन , 08 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत सांगितले आहे की, इराणवर होऊ शकणारे संभाव्य हल्ले आणि बॉम्बहल्ले सध्या दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की हा ‘दोन्ही बाजूंनी लागू होणारा युद्धविराम (सीजफायर)’ असेल. म्हणजेच या कालावधीत ना अमेरिका हल्ला करेल, ना इराण कोणतीही आक्रमक कारवाई करेल.मात्र या करारासाठी एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे — इराणने तात्काळ, पूर्णपणे आणि सुरक्षित पद्धतीने होर्मुज सामुद्रधुनी जहाजवाहतुकीसाठी खुली करावी लागेल.

ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने आधीच आपली अनेक लष्करी उद्दिष्टे साध्य केली असून आता इराणसोबत दीर्घकालीन शांतता करारासाठी वेगाने चर्चा सुरू आहे.त्यांनी सांगितले की इराणकडून १० मुद्द्यांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याला चर्चेचा आधार मानले जात आहे. ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिका आणि इराण यांच्यातील जुन्या वादांपैकी बहुतांश मुद्द्यांवर सहमती झाली आहे. पुढील दोन आठवड्यांत अंतिम करार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर पश्चिम आशियातील दीर्घकाळ चालत आलेला तणाव कमी करण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा ठरेल, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत स्पष्ट इशारा दिला होता की, इराणने लवकरात लवकर होर्मुज सामुद्रधुनी खुली केली नाही आणि करार मान्य केला नाही, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, “मंगळवार रात्री ८ वाजता (ईस्टर्न टाइम)!” यापूर्वी त्यांनी इशारा दिला होता की मार्ग खुला न केल्यास अमेरिका इराणची ऊर्जा व्यवस्था आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते. त्यांनी असेही म्हटले होते की, “होर्मुज सामुद्रधुनी खुली झाली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पूल हे लक्ष्यावर असतील.”

ट्रम्प यांनी यापूर्वी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता, मात्र नंतर ही मुदत अनेकदा वाढवण्यात आली आणि शेवटी ती ८ एप्रिलच्या रात्रीपर्यंत वाढवण्यात आली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की कराराची शक्यता अजूनही कायम आहे; पण चर्चा अपयशी ठरल्यास ते “सर्व काही संपवतील” असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच, इराणमधील सामान्य नागरिक त्यांच्या सरकारवर नाराज असून अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा देऊ शकतात, असा दावा देखील ट्रम्प यांनी केला होता.

या संघर्षाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांपासून झाली. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. अमेरिका–इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले. तसेच इस्रायलवरही इराणकडून क्षेपणास्त्र डागण्यात आली. या युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनी मार्गे होणारी जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande