बीड - माजलगाव येथे रविवारी दिव्यांग मार्गदर्शन, सुविधा शिबिराचे आयोजन
बीड, 09 एप्रिल, (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मार्गदर्शन व त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग मार्गदर्शन व सुविधा शिबिराचे आयोजन कानिफनाथ सेवाभावी संस्थेच्या वतीने आ. प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
बीड - माजलगाव येथे रविवारी दिव्यांग मार्गदर्शन, सुविधा शिबिराचे आयोजन


बीड, 09 एप्रिल, (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मार्गदर्शन व त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग मार्गदर्शन व सुविधा शिबिराचे आयोजन कानिफनाथ सेवाभावी संस्थेच्या वतीने आ. प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारी, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव येथे होणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते होणार असून यावेळी जयसिंग सोळंके, सतीशकुमार सोळंके (जिल्हा शल्यचिकित्सक, बीड), उल्हास गंडाळ (जिल्हा आरोग्य अधिकारी), संतोषरुईकर (तहसीलदार, माजलगाव), जोस्त्रा मुळीक (गट विकास अधिकारी), तसेच वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी कार्ड नाही, त्यांची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदानाबाबत मार्गदर्शन, पंचायत समिती व तहसील कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, सहाय्यक उपकरणांबाबत माहिती व मदत, तसेच विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande