सोलापूर विद्यापीठात संत गाडगेबाबा यांना अभिवादन व वृक्षारोपण
सोलापूर, 09 एप्रिल, (हिं.स.)।पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा अंतर्गत गुरुवारी संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्
evm


सोलापूर, 09 एप्रिल, (हिं.स.)।पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा अंतर्गत गुरुवारी संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यापीठाच्या अतिथीगृहासमोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास कुलगुरू प्रा.डॉ.लक्ष्मीकांत दामा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,समन्वयक डॉ.गौतम कांबळे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ.श्रीकांत अंधारे,वित्त व लेखाधिकारी डॉ.महादेव खराडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.समता सप्ताहाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले : जीवन व कार्य’ या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांमधून सामाजिक समतेचे मूल्य,स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande