कसबा गणपती मंडळ समाजसेवेचे आदर्श उदाहरण – डॉ. खा. ज्योती वाघमारे
सोलापूर, 09 एप्रिल, (हिं.स.)। श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने नूतन राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा विजयालक्ष्मी बाळासाहेब मुस्तारे यांच्या शुभहस्ते सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, गणपतीची प्रतिमा व पु
wryf


सोलापूर, 09 एप्रिल, (हिं.स.)। श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने नूतन राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा विजयालक्ष्मी बाळासाहेब मुस्तारे यांच्या शुभहस्ते सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, गणपतीची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कसबा गणपती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू नगरसेवक अमोल शिंदे मल्लिनाथ खुने, केदार मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, शिवशंकर कोळकूर, बिप्पीन धुम्मा, शिवानंद बुगडे, रामचंद्र जोशी, आप्पासाहेब बिराजदार, अमित गुंगे, नागनाथ मेंगाणे, प्रविण वाले, पुष्कराज मेत्री, आनंद मुस्तारे, जगदीश हिरेहब्बू, अनिल मसरे, लक्ष्मण भाईकट्टी, गुरुशांत मोकाशी, इरप्पा राजमाने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ. वाघमारे यांनी मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक करत, “कसबा गणपती मंडळ हे केवळ धार्मिक परंपरा जपणारे नसून समाजसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे एक आदर्श उदाहरण आहे,” असे गौरवोद्गार काढले.रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत, सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या उपक्रमांमुळे मंडळाने समाजात वेगळी व मानाची ओळख निर्माण केली आहे, असे त्यांनी नमूद केले. “अशा संस्थांचा सन्मान म्हणजे समाजातील सेवाभावाचा सन्मान आहे,” असेही त्या म्हणाल्या.“या सत्कारामुळे मला जनतेसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची नवी उमेद व बळ मिळाले आहे,” असे सांगत त्यांनी मंडळाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande