आमदार प्रशांत बंब यांच्याकडून शेकडो प्रकरणांचा जागीच निपटारा
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ''जनता दरबारात'' शेकडो तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात आला. आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमात नागरिकां
Q


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)।

स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'जनता दरबारात' शेकडो तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात आला. आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमात नागरिकांनी पाणी, वीज, रस्ते, महसूल आणि शासकीय योजनांशी संबंधित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी प्रत्येक तक्रारीची गांभीयनि दखल घेत बंब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश देत अनेक प्रकरणे जागेवरच निकाली काढली.

या जनता दरबाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांना दिलेली प्राथमिकता. अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे अवघ्या एका दिवसात उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, स्वरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आमदारांनी स्वतःच्या निधीतून मदत जाहीर केल्याने तरुण वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आमदार बंब यांनी यावेळी दिला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande