पोलीस पाटील ज्ञानोबा मुंडे यांना 'राज्यपाल पुरस्कार' जाहीर
बीड, 09 एप्रिल (हिं.स.)। पांगरी (ता. परळी) येथील पोलीस पाटील ज्ञानोबा भगवानराव मुंडे यांची सन २०२५-२६ च्या ''पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्कारासाठी'' निवड करण्यात आली आहे. गावपातळीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेल्या
पोलीस पाटील ज्ञानोबा मुंडे यांना 'राज्यपाल पुरस्कार' जाहीर


बीड, 09 एप्रिल (हिं.स.)।

पांगरी (ता. परळी) येथील पोलीस पाटील ज्ञानोबा भगवानराव मुंडे यांची सन २०२५-२६ च्या 'पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्कारासाठी' निवड करण्यात आली आहे. गावपातळीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि प्रभारी डीवायएसपी उमाशंकर

कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या प्रस्तावांमधून मुंडे यांच्या एकमेव नावाची अंतिम निवड झाली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालय, बीड येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. २५ हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande