बेरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याचा मृत्यू
जेरुसलेम , 09 एप्रिल (हिं.स.)।इस्त्रायलच्या सैन्याने गुरुवारी दावा केला की, बुधवारी बेरूतमध्ये झालेल्या इस्त्रायली हवाई हल्ल्यात हिज्बुल्लाह नेता नईम कासिम यांच्या सचिवाचा मृत्यू झाला आहे. आयडीएफने (इस्त्रायल डिफेन्स फोर्स) सांगितले की, बेरूतमधील
बेरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या सचिवाचा  मृत्यू


जेरुसलेम , 09 एप्रिल (हिं.स.)।इस्त्रायलच्या सैन्याने गुरुवारी दावा केला की, बुधवारी बेरूतमध्ये झालेल्या इस्त्रायली हवाई हल्ल्यात हिज्बुल्लाह नेता नईम कासिम यांच्या सचिवाचा मृत्यू झाला आहे.

आयडीएफने (इस्त्रायल डिफेन्स फोर्स) सांगितले की, बेरूतमधील तल्लेत खयात परिसरात, हिज्बुल्लाहचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दाहियेह भागाबाहेर अली युसुफ हर्षी याला लक्ष्य करण्यात आले. समोर आलेल्या फुटेजमध्ये या हल्ल्यामुळे एक बहुमजली इमारत अंशतः कोसळल्याचे दिसून आले. सैन्याच्या माहितीनुसार, हर्षी हा कासिम यांचा पुतण्या आणि वैयक्तिक सचिव होता.

सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे, “हर्षी हा हिज्बुल्लाहचे महासचिव नईम कासिम यांचा निकटवर्तीय सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होता. त्यांच्या कार्यालयाचे तसेच सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.”

दरम्यान, आयडीएफने सांगितले की रात्रीच्या वेळी लिटानी नदीवरील दोन प्रमुख मार्गांवर हल्ला करण्यात आला. या मार्गांचा वापर हिज्बुल्लाह दक्षिण लेबनानमध्ये हजारो शस्त्रे, रॉकेट्स आणि लॉन्चर्स पोहोचवण्यासाठी करत होता.याशिवाय, दक्षिण लेबनानमध्ये सुमारे 10 शस्त्रसाठे, रॉकेट लॉन्चर आणि हिज्बुल्लाहच्या मुख्यालयांवरही हल्ले करण्यात आल्याची माहिती सैन्याने दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande