जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता
नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य भेटीवरून तीव्र राजकीय चर्चा सुरू आहे. हे दोन्ही नेते फ्रान्समध्ये समोरासमोर भेटू शकतात, असे संकेत मिळत आहेत. फ्रान्स जूनमध्ये जी-७ शिखर परिषदेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य भेटीवरून तीव्र राजकीय चर्चा सुरू आहे. हे दोन्ही नेते फ्रान्समध्ये समोरासमोर भेटू शकतात, असे संकेत मिळत आहेत.

फ्रान्स जूनमध्ये जी-७ शिखर परिषदेचे आयोजन करत आहे, जिथे दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर असताना, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.

त्यांची शेवटची भेट १३ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हाईट हाऊसमध्ये झाली होती. आता, अध्यक्ष ट्रम्प देखील या शिखर परिषदेला उपस्थित राहू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. या वर्षीची जी-७ शिखर परिषद १५ ते १७ जून दरम्यान फ्रेंच आल्प्समधील एव्हियान-ले-बेन्स येथे होणार आहे.

अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), व्यापार आणि गुन्हेगारीचा सामना करण्याच्या जागतिक प्रयत्नांवर चर्चा केंद्रित करण्याचा आहे. विशेष म्हणजे, ही शिखर परिषद ट्रम्प यांच्या ८० व्या वाढदिवसानंतर केवळ एका दिवसाने सुरू होणार आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संकेत दिले आहेत की, या बैठकीत कोणत्याही औपचारिक करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी जी-७ शिखर परिषदेतील सहभाग यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला निश्चित झाला. भारतातील फ्रेंच दूतावासाने ही माहिती दिली. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भारताचा अधिकृत दौरा केला, ज्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande