नांदेडमध्ये पशुसंवर्धन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
नांदेड, 21 मे (हिं.स.)। पशुसंवर्धन विभाग नांदेड व महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “पशुसंवर्धन दिन” मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी जिजाई ब्लड बँक, नांदेड यांच्या सहका
अ


नांदेड, 21 मे (हिं.स.)।

पशुसंवर्धन विभाग नांदेड व महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “पशुसंवर्धन दिन” मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यावेळी जिजाई ब्लड बँक, नांदेड यांच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 37 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. तसेच “पशुमधील अनियमित माज व वंध्यत्व निवारण” या विषयावर Intas Animal Health यांच्या सहकार्याने तांत्रिक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.

महिलांवरील कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम या विषयावर जिल्हा बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील नवनियुक्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पशुवैद्यकांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कार्याचे कौतुक करत नांदेड जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी विभागाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले व शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande