
पुणे, 21 मे, (हिं.स.)। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चासकमान डावा कालवा परिसरात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार चासकमान डावा कालव्याच्या दोन्ही बाजूंना १०० मीटर परिसरात ३१ मे २०२६ पर्यंत विविध प्रतिबंध लागू राहणार आहेत. परिसरातील शांतता व सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम २२३ अन्वये तसेच इतर प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु