पिंपरी-चिंचवड आरटीओचा ९३ जप्त वाहनांचा ई-लिलाव १० जूनला
पुणे, 21 मे, (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध कारणांमुळे जप्त केलेली तसेच मोटार वाहन कर न भरल्याने आणि संबंधितांनी दावा न केलेली एकूण ९३ वाहने ऑनलाईन ई-लिलावासाठी उपलब्ध करण्य
rto


पुणे, 21 मे, (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध कारणांमुळे जप्त केलेली तसेच मोटार वाहन कर न भरल्याने आणि संबंधितांनी दावा न केलेली एकूण ९३ वाहने ऑनलाईन ई-लिलावासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.

हा ई-लिलाव बुधवार, १० जून २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत MSTC India या संकेतस्थळावर आयोजित करण्यात येणार आहे.

लिलावातील सर्व वाहनांची विक्री ‘भंगार’ स्वरूपात करण्यात येणार असून Registered Vehicle Scrapping Facility (RVSF) संस्थांना यात सहभाग घेता येणार आहे. लिलावासाठी ठेवलेली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड कार्यालय परिसरासह राजगुरूनगर आणि मंचर बस डेपो येथे ठेवण्यात आली आहेत. इच्छुकांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि वेळेत वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande