पिंपरी-चिंचवडमध्ये १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त
पुणे, 21 मे (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्याया फ क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात
sdfg


पुणे, 21 मे (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्याया फ क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान उप आयुक्त अतुल पाटील, प्रशासन अधिकारी महादेव बोरे, बांधकाम परवानगी विभागाचे उप अभियंता किरण सगर व कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, तसेच उद्यान स्थापत्य व क्रीडा विभागाचे कनिष्ठ अभियंता वैभव विटकरे उपस्थित होते. याशिवाय बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) साक्षी जांभुळकर, निकिता भोईटे, विकास वारभुवन आणि रूपक शिनगारे यांनीही कारवाईत सक्रिय सहभाग नोंदविला.

सदर मोहिमेसाठी फ, अ आणि क क्षेत्रीय कार्यालयांतील ५७ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच १७ अतिक्रमण पोलीस, ६ जेसीबी मशीन, ८ मजूर आणि ३ वाहन चालक यांच्या मदतीने कारवाई प्रभावीपणे पूर्ण करण्यात आली.

शहरातील सार्वजनिक जागा आणि नागरिकांसाठी राखीव असलेली मैदाने अतिक्रमणमुक्त ठेवणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत बांधकामांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नसून, शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande