पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारी - अतिरिक्त आयुक्त
पुणे, 21 मे (हिं.स.)। पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि देशातील आदर्श शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची गरज असल्याचे मत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत नागरिकांकडून
PCMC


पुणे, 21 मे (हिं.स.)। पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि देशातील आदर्श शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची गरज असल्याचे मत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत नागरिकांकडून मिळणारा अभिप्राय हा शहराच्या स्वच्छता व्यवस्थेच्या मूल्यमापनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत अभिप्राय नोंदवून शहराला देशात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले की, स्वच्छ आणि सुंदर शहर घडविणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी दिलेला अभिप्राय शहराच्या कामगिरीचे प्रतिबिंब ठरत असल्याने सकारात्मक सहभाग आवश्यक आहे.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही नागरिकांचा सहभाग हा स्वच्छता अभियानाच्या यशाचा मुख्य आधार असल्याचे नमूद केले. नागरिकांनी अभिप्राय देताना शहरातील स्वच्छता उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. प्रत्येक अभिप्राय प्रशासनाला अधिक प्रभावी नियोजनासाठी मदत करणार असून, स्वच्छ आणि सुंदर शहर उभारण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच शहराच्या स्वच्छता अभियानात प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असून, प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवून सहभागी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अभिप्राय नोंदविण्यासाठी नागरिकांनी संकेतस्थळाला भेट देऊन विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande