पुण्यात ३६० स्वयंसेवकांना क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण
पुणे, 21 मे, (हिं.स.)। ऑफ सिंदूर उपक्रमांतर्गत “ऑफ अभ्यास” मोहिमेद्वारे ३६० स्वयंसेवकांना “क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण” देण्यात आले. प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय गृह विभाग आणि र
पुण्यात ३६० स्वयंसेवकांना क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण


पुणे, 21 मे, (हिं.स.)। ऑफ सिंदूर उपक्रमांतर्गत “ऑफ अभ्यास” मोहिमेद्वारे ३६० स्वयंसेवकांना “क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण” देण्यात आले. प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

केंद्रीय गृह विभाग आणि राज्य गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपनियंत्रक नागरी संरक्षण दलामार्फत सेवाभवन, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे येथे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, नगरपरिषद प्रशासन सहाय्यक आयुक्त, प्रताप भोसले, राष्ट्रीय सेवा योजनेचे विंग कमांडर शैलेंद्र मराठे, कर्नल निशाद मंगळुरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

प्रशिक्षण सत्रामध्ये युद्धजन्य परिस्थितीत भूदल, नौदल आणि वायुदल देशाच्या सीमांवर कर्तव्य बजावत असताना नागरी संरक्षण दलाची नागरिकांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत, समन्वय आणि जनजागृती कशी करावी याचेही प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात आले.

या प्रशिक्षणाचा उपयोग आपत्ती किंवा युद्धसदृश परिस्थितीत प्रभावीपणे करावा तसेच अधिकाधिक नागरिकांपर्यंत प्रशिक्षण आणि प्रबोधन पोहोचवावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्याची माहिती सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण अर्जन खराडे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande