
नागपूर, 21 मे (हिं.स.) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून डॉ. अखिलेश वसंतराव पेशवे यांनी गुरुवार, दिनांक २१ मे २०२६ रोजी पदभार स्वीकारला. प्र-कुलगुरू नियुक्ती झाल्याने डॉ. अखिलेश पेशवे यांनी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी नवनियुक्त प्र-कुलगुरु डॉ. अखिलेश पेशवे यांचे स्वागत केले.
विद्यापीठाचे चौदावे प्र-कुलगुरू म्हणून डॉ. अखिलेश पेशवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यालयात कामकाजास सुरुवात केली. यावेळी कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मंगला हिरवाडे, ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ यांच्यासह विविध सांविधिक अधिकारी, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्र-कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. अखिलेश पेशवे यांचा विविध संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, विभाग शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis