पीक कर्ज व शासकीय योजनांमध्ये दिरंगाई; चार बँकांना नोटीस
सोलापूर, 21 मे (हिं.स.)। जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांसह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्जवितरण, खाते उघडणीची प्रगती तसेच विवि
hgf


सोलापूर, 21 मे (हिं.स.)।

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांसह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्जवितरण, खाते उघडणीची प्रगती तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत बँकांनी देण्यात आलेली उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच खाते उघडणीच्या कामात प्रत्येक बँकेने किमान ७५ टक्के उद्दिष्ट गाठावे, अशी सूचना करण्यात आली.

पीक कर्ज वितरण आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत झालेल्या दिरंगाईबाबत काही बँकांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यामध्ये ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बंधन बँक आणि करूर वैश्य बँक यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत नाबार्ड, ओबीसी महामंडळ, कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. निधी उपलब्धता, योजनांची प्रगती आणि अंमलबजावणीतील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.

कर्ज मंजुरी किंवा नकार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे निर्देश देत, कर्ज नाकारलेल्या लाभार्थ्यांना त्यामागील कारण लेखी स्वरूपात कळविण्याचे आदेश प्रशासनाने दिले.

यावेळी बँक अधिकारी राम वाखार्डे, कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ तसेच ओबीसी वित्त-विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande