अक्कलकोट आणि चिंचोली एमआयडीसीतील प्रश्नांवर जिल्हाधिकारी स्तरावर चर्चा
सोलापूर, 21 मे (हिं.स.)। जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक २० मे रोजी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस इंडस्ट्रियल असोसिएशन, अक्कलकोट रोड एमआयडीसी आणि चिंचोली एमआयडीसीचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच महापा
Collctor


सोलापूर, 21 मे (हिं.स.)। जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक २० मे रोजी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस इंडस्ट्रियल असोसिएशन, अक्कलकोट रोड एमआयडीसी आणि चिंचोली एमआयडीसीचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांच्या कमतरतेबाबत इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. विशेषतः अक्कलकोट एमआयडीसीमधील पाणीपुरवठा, खराब रस्ते, ड्रेनेज लाईन आणि रस्त्यावरील दिव्यांच्या समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्स्टाईल शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर महापालिका आयुक्तांसमवेत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची विनंती असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी औद्योगिक वसाहतींमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.

एमआयडीसीमधील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून ७५ टक्के, महापालिकेकडून १२.५ टक्के आणि उर्वरित १२.५ टक्के निधी जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत उपलब्ध करून देण्यास सुकाणू समितीने मागील बैठकीत मान्यता दिली होती. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

दरम्यान, एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणांबाबत कडक भूमिका घेत अतिक्रमण करणाऱ्यांसह त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande