भूमिका आधारित प्रशासनासाठी क्षमता बांधणी आराखडा आवश्यक : व्ही. राधा
पुणे, 21 मे, (हिं.स.)। विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी व्यक्त केले. क्षमता
grdf


पुणे, 21 मे, (हिं.स.)। विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी व्यक्त केले. क्षमता बांधणी आराखड्याची निर्मिती हा प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

यशदा येथे आयोजित क्षमता बांधणी आराखड्याच्या प्रगती आढावा कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी यशदाचे महासंचालक उपमहासंचालक डॉ. सुहास दिवसे उपसचिव नीता शिंदे , डिजिटल लर्निंग लॅब प्रमुख कल्याणी गाेखले आणि संचालक शाहूराज माेरे उपस्थित होते.

व्ही. राधा यांनी सांगितले की, प्रशासनाच्या शेवटच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपर्यंत क्षमता विकासाचा विचार पोहोचला पाहिजे. प्रत्येक पदासाठी आवश्यक कौशल्य, तंत्रज्ञान आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करणे गरजेचे आहे. कार्यात्मक तसेच वर्तणूकविषयक क्षमतांचा विकास टप्प्याटप्प्याने होईल, अशा पद्धतीने प्रशिक्षण आराखडा तयार करावा, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande