सोलापूर जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर परिषद मिळून ६१६ मतदार ठरणार निर्णायक
सोलापूर, 21 मे (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून या निवडणुकीत बॅलेट पेपरवर पसंतीक्रमानुसार मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. यंदाच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण ६१६ मतदा
Vidhan Parishad


सोलापूर, 21 मे (हिं.स.)।

विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून या निवडणुकीत बॅलेट पेपरवर पसंतीक्रमानुसार मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

यंदाच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण ६१६ मतदार पात्र ठरणार आहेत. यामध्ये ४९ स्वीकृत नगरसेवकांचा समावेश असून त्यांच्या मतदान अधिकाराबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्रांताधिकारी कार्यालयात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ मे ते १ जूनदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने राज्यातील कोणत्याही मतदारसंघाचा मतदार असणे आवश्यक असून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील मतदार सूचक म्हणून आवश्यक असणार आहे.

या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ६८, महानगरपालिकेचे १११ आणि नगर परिषदांचे ४२६ असे एकूण ६१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande