लातूर - साहित्य भारती उदगीर शाखेच्या अध्यक्षपदी सुनंदा सरदार
लातूर, 21 मे, (हिं.स.)। अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत असलेल्या साहित्य भारतीच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यीका व कवयित्री सुनंदा सरदार यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापिका तृप्ती पंडित, व्यंकट कंकुरे, जिल
सुनंदा सरदार


लातूर, 21 मे, (हिं.स.)। अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत असलेल्या साहित्य भारतीच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यीका व कवयित्री सुनंदा सरदार यांची निवड करण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापिका तृप्ती पंडित, व्यंकट कंकुरे, जिल्हा मंत्रीपदी निवृत्त मुख्याध्यापिका शिवनंदा सोलापुरे, कोषाध्यक्षपदी मयूर कुलकर्णी, लोकसाहित्य कार्यपदी अॅड. अश्विनी कुलकर्णी, बालसाहित्य कार्य-कल्पना नळगीरकर, महिला साहित्यीक अश्विनी निवर्गी, प्रचार समाज माध्यम-व्ही. एस. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. साहित्य भारतीच्या माध्यमातून साहित्यीक चळवळीला नवसंजीवनी, नवोदित साहित्यीकांना व्यासपीठ मिळवून देणे असे राबविण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष सुनंदा सरदार म्हणाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande