ठाणे - गावदेवी दुर्घटनेतील शहीद सागर शिंदे यांना मानवंदना
ठाणे, 21 मे, (हिं.स.) : गावदेवी भाजी मंडई परिसरात आगलेली आग विझवताना शहीद झालेले अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे यांचे पार्थिव नितिन कंपनी येथील अग्न‍िशमन केंद्र येथे आणण्यात आले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार जितेंद
ठाणे


ठाणे, 21 मे, (हिं.स.) : गावदेवी भाजी मंडई परिसरात आगलेली आग विझवताना शहीद झालेले अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे यांचे पार्थिव नितिन कंपनी येथील अग्न‍िशमन केंद्र येथे आणण्यात आले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, नगरसेवक योगेश जानकर, मुकेश मोकाशी, नारायण पवार, अभिजीत पवार अतिरिक्त आयुक्‌त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे यांनी शहीद सागर शिंदे यांना मानवंदना दिली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शहीद सागर शिंदे यांच्या मातोश्री जयश्री शिंदे, पत्नी माधुरी शिंदे यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

यावेळी ठाणे अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल, नवी मुंबई अग्शिमन दल, पनवेल अग्निशमन दल, कुळगांव बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी यांनी देखील शहीद सागर शिंदे यांना मानवंदना दिली.

या दुर्घटनेत मृत पावलेले सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर (वय 55) यांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांचे मूळ गावी गाडेकरवाडी, गंगापूर, आंबेगाव, जिल्हा पुणे येथे नेण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande