नाशिक कुंभमेळ्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ स्वयंसेवकांचे मिळणार योगदान
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट नाशिक, 22 मे (हिं.स.)। : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नियोजनाची व्यापक तयारी सुरू केली असून या महाआयोजनात आध्यात्मिक व सामाजिक स
Art of Living' volunteers


गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट

नाशिक, 22 मे (हिं.स.)।

: आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नियोजनाची व्यापक तयारी सुरू केली असून या महाआयोजनात आध्यात्मिक व सामाजिक संस्थांचाही सक्रिय सहभाग वाढताना दिसत आहे. कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी बेंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन’ आश्रमात परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत अत्यंत सकारात्मक, सखोल आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुदेवांना कुंभमेळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असून, ते त्यांनी स्वीकारले आहे.नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक आणि धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक या महापर्वासाठी उपस्थित राहतात. त्यामुळे प्रशासनासमोर गर्दी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद, वाहतूक नियंत्रण, हरवलेल्या भाविकांना मदत, स्वच्छता आणि मार्गदर्शन यांसारखी मोठी आव्हाने असतात. अशा परिस्थितीत प्रशिक्षित आणि सेवाभावी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या मोठ्या स्वयंसेवक नेटवर्कचे सहकार्य मिळावे, अशी विनंती गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याकडे केली. त्यावर गुरुदेवांनी सकारात्मक प्रतिसाद देत कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात येतील आणि ते कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा व समर्पणभावाने योगदान देतील, अशी ग्वाही दिली.आर्ट ऑफ लिव्हिंग’चे स्वयंसेवक देशभरात विविध सामाजिक, आध्यात्मिक आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत. भाविकांना मार्गदर्शन, गर्दी नियंत्रणात प्रशासनाला सहाय्य, शिस्तबद्ध रांग व्यवस्था, स्वच्छता जनजागृती, मानसिक समुपदेशन आणि सेवा उपक्रम यामध्ये त्यांचे योगदान कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे.राज्य शासन आणि सामाजिक-आध्यात्मिक संस्थांमधील हे समन्वयात्मक सहकार्य आगामी कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. अध्यात्म, सेवा आणि समाजहित या त्रिसूत्रीला बळ देणारी ही भेट भविष्यातील कुंभमेळा व्यवस्थापनासाठी नवी दिशा देणारी ठरणार आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन’ आश्रमात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांची पाहणी केली. यावेळी आश्रमाच्यावतीने मंत्री महाजन यांचे स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान स्वामी वैश्यपायन जी, ॲडव्होकेट विशाल चव्हाण आणि निलेश बोरा उपस्थित होते.

चौकट पायाभूत सुविधांची िदली माहिती यावेळी मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडून सुरू असलेल्या विकासकामांची, पायाभूत सुविधांची, वाहतूक व्यवस्थेची, स्वच्छता अभियानाची तसेच गर्दी नियंत्रणासाठी आखण्यात येत असलेल्या आधुनिक नियोजनाची माहिती सादर केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande