बीड नगर परिषदेला पाणी व स्वच्छतेसाठी ४८.२९ कोटींचा निधी मंजूर
बीड, 22 मे (हिं.स.)।बीड शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार बीड नगर परिषदेला ४८ कोटी २९ लाख रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाला आहे. नगर परिषदेचे गटनेते फारुख पटेल आणि नगरसेवक अमर नाईकवाडे
बीड नगर परिषदेला पाणी व स्वच्छतेसाठी ४८.२९ कोटींचा निधी मंजूर


बीड, 22 मे (हिं.स.)।बीड शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार बीड नगर परिषदेला ४८ कोटी २९ लाख रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाला आहे. नगर परिषदेचे गटनेते फारुख पटेल आणि नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. हा निधी 'बंधनकारक अनुदान' स्वरूपात मिळाला असून, त्यातील ५० टक्के रक्कम पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा व पाण्याच्या पुनर्वापरासाठी खर्च केली जाईल, तर उर्वरित ५० टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील प्रलंबित असलेला हा निधी आता एकत्रित मिळाल्यामुळे शहरातील जुन्या गळती लागलेल्या जलवाहिन्यांचे नूतनीकरण, पाणी वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि कचरा संकलनासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्याच्या विकासकामांना मोठी गती मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande