बीड पोलीस दलात २५३ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या
बीड, 22 मे (हिं.स.)।बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया कोणत्याही वशिलेबाजीशिवाय अत्यंत गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील
बीड पोलीस दलात २५३ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या


बीड, 22 मे (हिं.स.)।बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया कोणत्याही वशिलेबाजीशिवाय अत्यंत गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटिंग कक्षात सलग ९ तास चाललेल्या 'मॅरेथॉन' समुपदेशन प्रक्रियेनंतर २५३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत एका ठिकाणी ५ वर्षे आणि एका तालुक्यात १२ वर्षे सेवेचा नियम लावण्यात आला होता. कर्मचाऱ्यांची सेवा, त्यांचे पसंतीचे पोलीस ठाणे आणि उपलब्ध जागा यांचा ताळमेळ घालत जागेवरच 'ऑन द स्पॉट' निर्णय घेण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेत आयपीएस अधिकारी ऋषीकेश शिंदे व आयपीएस अधिकारी व्यंकटराम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासकीय बदल्यांचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता लवकरच 'विनंती बदल्यांची' प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande