
नाशिक, 22 मे (हिं.स.) : वरिष्ठ आणि कनिष्ठ गटाची राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धा येत्या 4 ते 7 जून 2026 दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे महिला, पुरुष तसेच कनिष्ठ गटातील मुला-मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघाची निवड करण्याकरिता निवड चाचणीचे आयोजन 24 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता जिजामाता क्रीडा संकुल, तलाठी कॉलनी, तारवाला नगर जवळ, बिडी कामगार लिंक रोड, दिंडोरी रोड, नाशिक येथे करण्यात आले आहे.वरिष्ठ गटासाठी वयोमर्यादा खुली असून, कनिष्ठ गटासाठी 1 जानेवारी 2008 नंतर जन्मलेले खेळाडू या चाचणीत सहभागी होऊ शकतात. या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सेपक टकरा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, कार्याध्यक्ष (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त) आनंद खरे, तसेच सचिव दीपक निकम-पाटील यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9766016178 किंवा 9595343435 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV