
कळवण, सिन्नर येथे आंदोलन : तीन हजार रुपये दराची मागणी सिन्नर / कळवण, 22 मे (हिं.स.)। कांद्याला प्रतिक्विंटल हजार रुपये भाव मिळावा तसेच सर्व शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २२) जिल्ह्यात सिन्नर, कळवण येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतत सरकारी धोरणांचा तीव्र निषेध केला.
कळवण येथे शेतकऱ्यांनी बस स्थानकासमोर रस्ता रोको करत पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांना निवेदन दिले. सिन्नर येथील मार्केट कमिटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने 'कांदा ओता' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आम आदमी पार्टी व शेतकरी संघर्ष समितीनेही सहभाग घेतला होता. तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कळवणला रस्त्यावर कांदा ओतत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
याप्रसंगी विलास रौंदळ, महेंद्र हिरे, घनश्याम पवार, काशीनाथ गुंजाळ, रामा पाटील, शशी हिरे, किशोर पवार, योगेश पगार, जगन पाटील आदी. कांद्याला ३ हजार भाव मिळालाच पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कळवण येथेही आंदोलन झाले. सरकारने कांद्याला १२३५ रुपयांचा बाजार भाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी दिला. रस्त्यावर कांदा ओतून देत संताप व्यक्त केला. रासायनिक खतांच्या किंमती वाढविल्यास खासदार आमदारांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशारा देखील यावेळी शेतकरी नेत्यांनी दिला आहे ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV