नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ
नाशिक, 22 मे (हिं.स.)। : केंद्र सरकारच्या नाफेडने जिल्ह्यामध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू केले असले तरी देखील खुल्या बाजारापेक्षा नाफेडचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळत असल्य
नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ


नाशिक, 22 मे (हिं.स.)।

: केंद्र सरकारच्या नाफेडने जिल्ह्यामध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू केले असले तरी देखील खुल्या बाजारापेक्षा नाफेडचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

कांद्याच्या भावावरून केंद्र सरकार आक्रमक झाले आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केंद्र सुरू केली आहेत परंतु प्रत्यक्षात खुल्या बाजारापेक्षा दराचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्रांकडे न जाणे पसंत केले आहे तसेच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार देखील मागच्या वेळेस झाला होता त्याच्यामुळे ही शेतकरी वर्ग नाफेड च्या केंद्रांकडे जाण्यास तयार नाही

बांगलादेश व यमन देशात कांद्याचे भरघोस उत्पादन त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्यांची निर्यात थांबल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यातच नाफेडने जाहीर केलेल्या दरापेक्षा खुल्या बाजारातील व्यापारी जादा दर देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात नाफेडकडे केवळ ४४ टन कांदा खरेदी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन व कांदा बियाणे उत्पादनाचा धर्तीवर बांगला व यमन देशात स्थानिकस्तरावर त्यांना दर्जेदार कांदा उपलब्ध होत आहे. त्यातच इराण युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने गत सप्ताहात आमदार रोहित पवारांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पिंपळगाव येथे नाफेड व एमपीएस केंद्राला भेट देऊन एकूण खरेदीचा आढावा घेतला. रतसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्ह्यात केवळ ४४ टन कांद्याची खरेदी झाल्याची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मिळाली. नाफेडने कांद्याला १३३५रुपये क्विंटलचा दर जाहीर केला आहे. त्यासाठी पूर्वनोंदणी, पीक नोंदणी आवश्यक आहे. नाफेडच्या नियमानुसार चांगल्या दर्जाच्या कांद्याला खुल्या बाजारात दोनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल दर जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडपेक्षा खुल्या बाजारात विक्रीला अधिक प्राधान्य देत आहेत. ७० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी केली नाही.

अनेक शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्याने द्राक्ष किंवा इतर मुख्य पिकांचीच पीक नोंदणी केली आहे. त्यात आंतरपिकाची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे ७० टक्के कांदा शेतकरी नाफेड पीक नोंदणी नसल्याने ते कांदा खरेदी करण्यास तयार नाही.

लासलगाव , पिंपळगाव बाजार समितीस भेटीप्रसंगी शेतकऱ्यांशी चर्चा करताना शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा कांदा साठवण करून ठेवला तर त्यांना दिवाळीनंतर चांगला दर मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा साठवून ठेवावा, त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. नाफेडला देऊ शकत नसल्याचे चित्र जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande