केंद्र सरकारवरकडून ओबीसींची फसवणूक - डाॅ.जितेंद्र आव्हाड
ठाणे, 22 मे (हिं.स.)। बिहार निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी मतांसाठी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. मतांच्या राजकारणासाठी ओबीसींना जातीनिहाय जनगणनेचे आश्वासन देणार्‍या केंद्र सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप करून करायची अस
केंद्र सरकारवरकडून ओबीसींची फसवणूक - डाॅ.जितेंद्र आव्हाड


ठाणे, 22 मे (हिं.स.)। बिहार निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी मतांसाठी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. मतांच्या राजकारणासाठी ओबीसींना जातीनिहाय जनगणनेचे आश्वासन देणार्‍या केंद्र सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप करून करायची असेल तर जातनिहाय जगनगणना करा; अन्यथा, जनगणना करूच नका, असे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान, काॅक्रोच जनता पार्टीला डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी समर्थन दिले. तसेच, भारताचा अपमान करणाऱ्या ट्रम्पविरोधात भाजपने भूमिका घ्यावी. त्यास सबंध देशाचा पाठिंबा मिळेल, असेही डाॅ. आव्हाड म्हणाले.

ओबीसींची जात गणना, काॅक्रोच जनता पार्टी, देशावरील आर्थिक अरिष्ट या विषयांवर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या सामाजिक - आर्थिक धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.

डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, बिहार निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने जनगणना करताना ओबीसींची स्वतंत्र गणना केली जाईल, असे जाहीर केले होते. बिहार निवडणुकीत ओबीसींना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने ही घोषणा केली होती. आता मात्र प्रत्यक्षात जनगणना सुरू झाल्यानंतर जनगणना फाॅर्ममध्ये ओबीसी गणनेचा उल्लेखच केला जात नाही विश्वनाथ प्रताप सिंग, लालूप्रसाद यादव , दिवंगत मुलायमसिंह यादव, महाराष्ट्रातील नेते कैलासवासी गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ ओबीसी समाजाची लढाई लढली आहे. मात्र, ओबीसींचा अस्तित्वाचा हा लढा बासनात गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. कांशीराम यांनी, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी , असे म्हटले होते. त्यामुळेच आमची संख्या किती आहे, हे आम्हाला समजू द्या ना ? एसटी एसटी, ओबीसी, बीसी यांची जातीनिहाय गणना झालीच पाहिजे. जनगणना न करताच महिला आरक्षणाचे कारण पुढे करीत मतदारसंघ वाढविण्याचा प्रयत्न करून संविधान पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसी डीएनए सांगणार्‍या भाजप सरकारने ओबीसींना चापट मारण्याची कृती केली आहे. ओबीसींची गणना न केल्यास ओबीसी पेटून उठतील, असा इशाराही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

*काॅक्रोच जनता पार्टीला उघड समर्थन*

सुप्रीम कोर्टातच तरूणाईला हिनवल्याने काॅक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला आहे. एका मराठी तरूणाने ही पार्टी स्थापन केली आहे. या काॅक्रोच जनता पार्टीला जर राजकीय पक्षांपेक्षा अधिक समर्थन मिळत असेल तर त्यांचे सोशल मिडीयावरील अकाउंट उडवाल, हा कुठला न्याय आहे? गेले काही दिवस जे बंडखोरी - विद्रोह करीत आहेत, त्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम, टवीटरवरील पेज डिलीट केले जात आहेत, हे योग्य आहे का? इंदिरा गांधी यांच्याविरोधात जेएनयूमध्ये आंदोलन सुरू असताना त्या स्वतः जेएनयूमध्ये निवेदन स्वीकारण्यासाठी गेल्था होत्या. त्यांना सीताराम येच्युरी यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आपल्या चुकांची माफीदेखील मागितली होती. मात्र, इथे सरकार तरूणाईला घाबरून निर्बंध लादत आहे. काॅक्रोच जनता पार्टीत बांगलादेशी आणि पाकिस्तानी असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, 94% फाॅलोवर्स हे भारतीय तरूण असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता काॅक्रोच पार्टीच्या अभिजित दीपके याला धमक्या दिल्या जात आहेत. हा मराठी तरूण असून त्याच्था मागे मराठी माणसाने उभे राहिले पाहिजे. मराठी तरूणाला धमक्या दिल्या जात असतील तर त्या सहन करू नयेत. आपला या काॅक्रोच जनता पार्टीला उघडपणे समर्थन आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

*परदेशात जाऊन देशाला घाबरविण्याचे काम मोदी करतात*

महागाई गगनाला भिडली आहे. बंगाल निवडणुकीच्या आधी सारं आलबेल आहे, असे सांगणारे मोदी आता तेल कमी वापरा, सोनं खरेदी करू नका, इंधन वपरू नका, असे सल्ले देत आहेय. आता तर भारतात बुरे दिन येणार आहेत, असे त्यांनी नेदरलॅंडमध्ये जाऊन सांगितले. अच्छे दिनचे वादे भारतात केले होते ना, मग भारतातच हे बोलायला हवे होते ना? पण, मोदींनी परदेशात जाऊन भारताला घाबरविले आहे. नेतृत्वाने देशाला आधार द्यायचा असतो; पण, हे नेतृत्व देशात भीती पसरवित आहेत. 2007 साली जागतिक मंदितही डाॅ. मनमोहनसिंग यांनी आपल्या बुद्धीकौशल्याने जनतेला झळही बहू दिली नव्हती. देशाला मार्ग दाखविला होता. मात्र, इथे घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असून पुढील दोन महिन्यात अनेक लघुगुंतवणूकदार आत्महत्या करतील, असे भाकीत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

*अमेरिकेची धमकी सहन करायला ट्रम्प आपला बाप नाही*

नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेमुळे मित्र राष्ट्र दुरावले आहेत. इराण युद्धात मोदींच्या भूमिकेमुळे आपल्याला हाॅर्मूझ सामुद्रधुनी बंद झाली. ट्रम्प परवानगी देईल तेव्हा आपण रशियाकडून तेल घेणार, ही कुठली पद्धत? मोदी आपले निवडून आलेले नेते आहेत. पण, तेच ट्रम्पला घाबरत आहेत. त्यामुळेच तो भारताचा अपमान करीत आहे. आपला अपमान करायला तो आपला बाप नाही. वारंवार भारत अपमानित होत आहे. त्याविरोधात भाजपने भूमिका घ्यावी. सबंध देशाचा त्यांना पाठिंबा मिळेल. आपल्याला स्वातंत्र्य ट्रम्पने दिलेले नाही, नेहरू, गांधी, बोस, पटेल आदींच्या संघर्षातून आपण स्वतंत्र झालो आहोत, हे मोदींनी लक्षात ठेवावे, असा टोलाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande