पुण्यात नव्या वाहनतळ धोरणाची तयारी; तीन टप्प्यांत होणार अंमलबजावणी
पुणे, 22 मे (हिं.स.)। शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या वाहनतळ धोरणाच्या तयारीत असून, लवकरच संपूर्ण शहरासाठी सुधारित ‘पे अँड पार्क’ धोरण लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी काही प्रमुख रस्त्यांवर राबविण्यात आलेले सशुल्क वाहनतळ धोरण राजकीय वि
पुण्यात नव्या वाहनतळ धोरणाची तयारी; तीन टप्प्यांत होणार अंमलबजावणी


पुणे, 22 मे (हिं.स.)।

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या वाहनतळ धोरणाच्या तयारीत असून, लवकरच संपूर्ण शहरासाठी सुधारित ‘पे अँड पार्क’ धोरण लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी काही प्रमुख रस्त्यांवर राबविण्यात आलेले सशुल्क वाहनतळ धोरण राजकीय विरोध, पोलिसांचा असहकार, वाहनांवरील कारवाईस टाळाटाळ आणि दमदाटीच्या प्रकारांमुळे गुंडाळावे लागले होते.आता मागील धोरणातील त्रुटी दूर करून प्रशासनाने नव्याने सर्वंकष आराखडा तयार केला आहे. हे धोरण तीन टप्प्यांत राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.पहिल्या टप्प्यात शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये धोरण लागू केले जाणार आहे. त्यानंतर वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असलेल्या परिसरांमध्ये अंमलबजावणी केली जाईल. तिसऱ्या टप्प्यात विकासकामे पूर्ण झालेल्या रस्त्यांवर वाहनतळ धोरण लागू करण्याचा मानस आहे. सध्या विकासकामे सुरू असलेल्या रस्त्यांवर अतिरिक्त वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून सुरुवातीला या भागांना वगळण्यात येणार आहे.नवीन धोरणानुसार रस्त्यावरील पार्किंगसाठी तुलनेने अधिक शुल्क आकारले जाणार आहे. रस्त्यावर वाहन उभे करण्यासाठी तासाला 10 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. तर पुलाखालील जागा किंवा मोकळ्या भूखंडांवरील पार्किंगसाठी कमी शुल्क ठेवण्यात येणार आहे.यामुळे नागरिक रस्त्यावरील पार्किंगऐवजी पर्यायी जागांवरील पार्किंगला प्राधान्य देतील आणि वाहतूक कोंडीत घट होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. तसेच पादचाऱ्यांना अधिक मोकळे आणि सुरक्षित पदपथ उपलब्ध व्हावेत, यासाठीही हे धोरण महत्त्वाचे ठरणार असल्याचे महापालिकेच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande