
रत्नागिरी, 22 मे (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा घाटात गोवरेवाडी बस थांब्याजवळ पहाटे झालेल्या रिक्षा अपघातातील रिक्षा चालक सुरेश शामराव साळोखे (वय ६६) यांचा रत्नागिरी येथे उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे.
रिक्षाचा अपघात कसा झाला याची खातरजमा पोलीस करीत असून अज्ञात वाहनाने धडक दिली असण्याची शक्यता गृहीत धरून साखरपा पोलीस बारकाईने तपास करीत आहेत. आंबा येथील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाणार आहे. मात्र अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी