सोलापूर भाजपमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी चुरस; उमेदवारीवर जोरदार लॉबिंग सुरू
सोलापूर, 22 मे (हिं.स.) : विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जाहीर केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षात (भाजप) उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र दिस
bjp


सोलापूर, 22 मे (हिं.स.) : विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जाहीर केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षात (भाजप) उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्याला एक जागा मिळण्याची शक्यता गृहित धरून इच्छुकांनी पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या नव्या धोरणानुसार विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक न लढविलेल्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार असल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षाकडून प्रभावी आणि तगडा उमेदवारच निवडला जाणार असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

तसेच उमेदवारी निवडताना जातीय समतोल साधण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सध्या जिल्ह्यातून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजन पाटील, प्रा. शिवाजी सावंत, शहाजी पवार, राजेंद्र राऊत तसेच भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी एका नावाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, यापूर्वी चर्चेत असलेली राम सातपुते, रणजित निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची नावे सध्या मागे पडल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुका आणि बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता भाजपकडून रणनीतीपूर्वक निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande