ज्येष्ठ समाजसेवक जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार
: राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत सोमवारी सन्मान अमरावती, 22 मे (हिं.स.)। श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ जनार्दनपंत बापूराव बोथे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला असून सोमवार, २५ मे रोजी नवी द
ज्येष्ठ समाजसेवक जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार: राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत सोमवारी सन्मान


: राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत सोमवारी सन्मान

अमरावती, 22 मे (हिं.स.)।

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ जनार्दनपंत बापूराव बोथे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला असून सोमवार, २५ मे रोजी नवी दिल्लीत एका विशेष सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

शिक्षण संस्थेची स्थापना : १९७२ मध्ये ‘राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासी आणि वंचित भागांत शाळा व वसतिगृहे सुरू करून हजारो दलित, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण आणि जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande