शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके
अमरावती, 22 मे (हिं.स.)। शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत वितरित करण्यात येणारी पाठ्यपुस्तके पंचायत समिती शिक्षण विभागाला नुकताच प्राप्त झाली आहेत. शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके वाटपच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.नगरपरिष
शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके


अमरावती, 22 मे (हिं.स.)।

शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत वितरित करण्यात येणारी पाठ्यपुस्तके पंचायत समिती शिक्षण विभागाला नुकताच प्राप्त झाली आहेत. शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके वाटपच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.नगरपरिषद, जिल्हा परिषद आदी शासकीय तसेच खासगी अनुदानित शाळांतील पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतात पंचायत समितीत नुकताच पहिल्या टप्प्यात आलेली पुस्तके शिक्षण विभागाकडून शिक्षण विभाग व समग्र सभागृहामध्ये उतरविण्यात आली आहेत. स्थानिक पाठ्यपुस्तके वितरणाचे काम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विषयतज्ञ सुनील वरखडे पाहत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पुस्तके पडणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात, विस्तार अधिकारी राम चौधरी, प्रभारी विस्तार अधिकारी प्रेमलाल भिलावेकर, विषय तज्ञ रावसाहेब मोरे, धर्मराज वानखडे, शारदा नवलकर, तृप्ती बिजवे, समग्र वरिष्ठ लेखा सहायक राहुल चित्रकार, डाटा एन्ट्री ऑपरेटर कम असिस्टंट प्रवीण अळसपूरकर आदी शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande