गावदेवी भाजी मंडईतील आगीची सखोल चौकशी व्हावी; राजन विचारे यांची मागणी
ठाणे, 22 मे (हिं.स.)। - ठाणे शहरातील ऐतिहासिक गावदेवी भाजी मंडईमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण आगडोंबाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. ह
गावदेवी भाजी मंडईतील आगीची सखोल चौकशी व्हावी; राजन विचारे यांची मागणी


ठाणे, 22 मे (हिं.स.)। - ठाणे शहरातील ऐतिहासिक गावदेवी भाजी मंडईमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण आगडोंबाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली की कोणी ती मुद्दामहून लावली? याचा सखोल तपास पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी करावा, असे विचारे यांनी आज स्पष्ट केले.

काल गावदेवी मंडईला शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांच्यासोबत नौपाडा विभाग प्रमुख रमेश शिर्के, तुषार रसाळ, इतर पदाधिकारी आणि मूळ गाळेधारक उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्षदर्शी आणि गाळेधारकांशी संवाद साधून आग कशी लागली, याची सविस्तर माहिती घेतली.त्यामध्ये गाळेधारकांच्या संवादातून असे जाणवले कि, हि गावदेवी भाजी मंडई दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून या जागेवर नवीन इमारत उभी करण्याचा घाट काहींकडून होत असल्याचे समजते याची चौकशी झाली पाहिजे. या भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यवसायाला परवानगी देऊ नये असे मी व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीनी मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या मृतांच्या कुटुंबियांच्या मागे शिवसेना खंभीरपणे उभी असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले.

*जेव्हा राजन विचारेंनी गाळेधारकांसाठी थेट विधानसभेत आणला होता 'हक्कभंग'!*

गावदेवी मंडई आणि येथील गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजन विचारे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या ऐतिहासिक पाठपुराव्याची आठवण या निमित्ताने ताजी झाली आहे. गेली १२ वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न विचारे यांनीच वैधानिक शस्त्रांचा वापर करून सोडवला होता.

*त्याचा संक्षिप्त प्रवास खालीलप्रमाणे:*

*पहिलेच अधिवेशन आणि लक्षवेधी* : ठाणे शहराचे आमदार झाल्यानंतर राजन विचारे यांनी पहिल्याच अधिवेशनात गावदेवी मंडईची अपुरी जागा, सुविधांचा अभाव आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास यावर दि. २३ डिसेंबर २००९ च्या चतुर्थ अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. व शासकीय गोदामाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली.

*शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा:* सभागृहात योग्य उत्तर न मिळाल्याने त्यांनी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब, मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब या नगरविकासमंत्री व महसूल मंत्री श्री. नारायण राणे साहेब यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. आर्थिक अधिवेशनात पुन्हा औचित्याचा मुद्दा उपस्थित करून गाळेधारकांच्या व्यथा मांडल्या. गाळेधारकांच्या वतीने न्यायालयातही दाद मागण्यात आली.

*ऐतिहासिक हक्कभंग प्रस्ताव:* पहिल्या अधिवेशनातील लक्षवेधीला उत्तर न मिळाल्यामुळे राजन विचारे यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री, प्रधान सचिव आणि नगरविकास विभागावर 'विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव' दाखल केला. व तो स्वीकृत झाला या आक्रमक पवित्र्यामुळे मंत्रालयात तातडीने बैठक झाली आणि अखेर गावदेवी मंडईची जागा ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. व दि. ४ मार्च २०१४ रोजी युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ज्या गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेली १२ वर्षे संघर्ष केला, आज त्यांच्यावर हे संकट आले आहे. शिवसेना या सर्व भाजीविक्रेते आणि गाळेधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या आगीचे गूढ उकललेच पाहिजे तसेच त्या गाळेधारकांची मूळ कागदपत्रे महापालिकेकडून त्यांना मिळवून देऊन त्यांना मैदानामध्ये तात्पुरत्या स्वरुपात मंडपाची उभारणी करून त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी या भाजी मंडईमध्ये पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अद्यावत करण्यात यावी.— राजन विचारे (नेते, शिवसेना उबाठा व माजी खासदार)

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande