
परभणी, 22 मे (हिं.स.)। गेल्या दोन तासापासून महानगरासह परिसरातील वातावरण बदलून सोसाट्याच्या वार्यासह काही भागात जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून महानगरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक अक्षरशः हैराण आहेत. शुक्रवारीसुध्दा दुपारी तापमान चांगलेच भडकले होते. परंतु, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वातावरणात बदल झाला. आभाळ आल्यानंतर सोसाट्याचा वाराही वाहू लागला. त्या पाठोपाठ खानापूर, एमआयडीसी वगैरे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर शहरातील मध्यवस्तीत हलका पाऊस झाला. दरम्यान, अन्यत्रही वातावरणातील या बदलाने नागरीक चक्राहून गेले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis