
अमरावती, 22 मे (हिं.स.)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्रे सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई-केवायसी करू शकले नाही अशा महिलांना जिल्ह्यांच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे कोणतेही निर्देश शासनस्तरावरून देण्यात आलेले नाही. या बातमीमुळे योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. बातमीमुळे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय शहर व तालुकास्तर कार्यालयात महिलांचा जमाव होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. काही लाभार्थ्यांचे माहे फेब्रुवारी 2026चा हप्ता दि. 28 मार्च व दि. 29 मार्च 2026 रोजी जमा झालेला आहे. मार्च 2026चा हप्ता लवकरात लवकर जमा होणार असल्याने लाभार्थींनी संयम ठेवावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी