रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विसावे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी, २२ मे (हिं.स.) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे विसावे मरणोत्तर देहदान पार पडले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांच्या शिष्यपरिवारातील मंजुळा वसंत तोडणकर (वय ९१, रा. तळवाडी, नाणीज, रत्नागिरी) यांचे
रत्नागिरीतील विसावे देहदान


रत्नागिरी, २२ मे (हिं.स.) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे विसावे मरणोत्तर देहदान पार पडले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांच्या शिष्यपरिवारातील मंजुळा वसंत तोडणकर (वय ९१, रा. तळवाडी, नाणीज, रत्नागिरी) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार आणि कुटुंबियांच्या संमतीने त्यांचे मरणोत्तर देहदान बुधवारी (दि. २१ मे) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले.

कै. मंजुळा तोडणकर यांच्या पश्चात मुलगा वसंत तोडणकर, सून व अन्य परिवारिय असा परिवार आहे. देहदानावेळी वसंत तोडणकर, त्यांची पत्नी तसेच नातेवाईक उपस्थित होते.

यावेळी रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी संदीप नार्वेकर, मुन्ना साळवी, अनिता जाधव, राजन बोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र महाराज संस्थानातर्फे करण्यात आलेले हे पाचवे देहदान असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच सागर भिंगारे, माणिक पाटील आणि नाणीजचे सरपंच विनायक शिवगण यांचे सहकार्य लाभले.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागातील डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव तसेच पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी आणि रुग्णवाहिका चालक पवन झोरे यांनी देहदान प्रक्रियेसाठी सहकार्य केले.------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande