समाज आणि देशहितासाठी संशोधन आवश्यक - कुलगुरु प्रा. डॉ. राजनीश कामत
कोल्हापूर, 22 मे (हिं.स.) - २१ व्या दशकाच्या तिसर्‍या शतकात आपण असून यातील प्रश्‍न पुष्कळ वेगळे आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचे पुष्कळ प्रवाह येत आहेत. यातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारची नोकरी मिळेल, यांसह अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर आहेत. अशा बदलणा
डॉ. राजनीश कामत


कोल्हापूर, 22 मे (हिं.स.) - २१ व्या दशकाच्या तिसर्‍या शतकात आपण असून यातील प्रश्‍न पुष्कळ वेगळे आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचे पुष्कळ प्रवाह येत आहेत. यातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारची नोकरी मिळेल, यांसह अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर आहेत. अशा बदलणार्‍या परिस्थितीत आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागेल. आपला समाज, देशहित यांसाठीही आपल्याला संशोधन केले पाहिजे. मानवी मूल्यांचा र्‍हास पुष्कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपण भारतीय ज्ञानाधारित व्यवस्था, मानवी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये कशी रूजवता येतील यासाठी प्रयत्न करावा लागेल, असे मत शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरु प्रा. डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केले. ते पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

तत्पूर्वी प्रा. डॉ. कामत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून शिवाजी विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला. कुलगुरु प्रा. डॉ. राजनीश कामत पुढे म्हणाले, आता मानवजातीसमोर जे प्रश्‍न आहेत ते प्रश्‍न केवळ एकच विभाग सोडवू शकत नाही. त्याला मानवी मूल्य, सामाजिक शास्त्र यांची जोड देऊन वेगवेगळे विभाग एकत्र येऊन काम करावे लागेल. विद्यापीठाने समाज, देशासाठी काम केले पाहिजे. शिवाजी विद्यापीठ वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी माझे प्रयत्न असतील. शिवाजी विद्यापीठाचे भरतीचे प्रमाण सध्या ५९ टक्के आहे. अन्य काही विद्यापीठांचा विचार केल्यास ते ८५ टक्क्यापर्यंत आहे. त्यामुळे यात आपल्याला वाढ करावी लागेल. शिवाजी विद्यापीठ हे एकमेव असे विद्यापीठ आहे जे समाजाभिमुख आहे. समाजाचे त्याच्यावर प्रेम आहे. मी या मातीतील असल्याने झोकून देऊन विद्यापीठासाठी जे जे करता येईल, ते मी करेन. विद्यापीठाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande