
मुंबई, 22 मे (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६” संदर्भात सूचना व हरकती मागविल्या असून राज्यातील सर्व संबंधित देवस्थान संस्थांनी या मसुद्याचा सखोल अभ्यास करून आपली मते शासनाकडे सादर करावीत, असे आवाहन शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी राज्यातील विविध देवस्थान संस्थांना पत्र पाठवून दि. ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सूचना, हरकती व मते सादर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या सूचना व हरकतींची प्रत माहितीस्तव त्यांच्या कार्यालयालाही पाठवावी जेणेकरून शासन स्तरावर देवस्थानांच्या हिताच्या मुद्द्यांवर प्रभावी पाठपुरावा करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील देवस्थानांचा आराखडा, व्यवस्थापन, परंपरा आणि हक्क यासंदर्भातील विविध विषय सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. देवस्थानांच्या हिताचे रक्षण व्हावे आणि नवीन कायद्यात त्यांचे मत प्रतिबिंबित व्हावे, यासाठी सर्व संबंधितांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील मसुदा काळजीपूर्वक वाचून आपली भूमिका मांडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या [अधिकृत संकेतस्थळावर](https://rfd.maharashtra.gov.in/?utm_source=chatgpt.com) उपलब्ध असलेला मसुदा ‘घोषणा’ विभागात प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर देवस्थान संस्थांनी अभ्यासपूर्ण सूचना सादर कराव्यात, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.
कार्यालय पत्ता :
डॉ. नीलम गोऱ्हे
मा. शिवसेना नेत्या व आमदार,
सिल्व्हर रॉक्स, हरे कृष्ण मंदिर पथ मॉडेल कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर, पुणे ४११०१६,
संपर्क: 9028333305
ईमेल: c3purandar@gmail.com
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी