मोबाईल ॲपद्वारे 1.73 लाख नागरिकांची स्वगणना; पुणेकरांचा मोठा सहभाग
पुणे, 22 मे (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या हद्दीत राष्ट्रीय जनगणना मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला वेग आला असून घरोघरी जाऊन कुटुंबनोंदणीचे काम सुरू आहे. मोहिमेच्या पहिल्याच पाच दिवसांत सुमारे 10 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती जनगणना
Jan gnagn


पुणे, 22 मे (हिं.स.)।

पुणे महापालिकेच्या हद्दीत राष्ट्रीय जनगणना मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला वेग आला असून घरोघरी जाऊन कुटुंबनोंदणीचे काम सुरू आहे. मोहिमेच्या पहिल्याच पाच दिवसांत सुमारे 10 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती जनगणना विभागाचे प्रमुख विजय लांडगे यांनी दिली.यंदाच्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वगणना उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 73 हजार नागरिकांनी स्वतःहून कुटुंबांची नोंदणी केली. यापैकी जवळपास 50 टक्के सहभाग पुणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा होता.दुसऱ्या टप्प्याला 15 मेपासून सुरुवात झाली असून या टप्प्यात प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित करत आहेत. या मोहिमेसाठी सुमारे 12 हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक प्रगणकावर सरासरी 800 घरांपर्यंत पोहोचून प्राथमिक माहिती गोळा करणे आणि घरांना क्रमांक देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे 14 लाख मिळकती आहेत. या पार्श्वभूमीवर जनगणना मोहीम युद्धपातळीवर राबवली जात असून 15 जूनपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.प्रगणकांना जनगणना प्रक्रियेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून माहिती संकलन अचूक आणि सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande