अमरावतीत वडिलांनी आपली किडनी देऊन वाचविले मुलाचे प्राण
अमरावती, 23 मे (हिं.स.) स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ( सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल अमरावती. येथे ७२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर रुग्ण हा काही महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त असल्याने त्यासाठी बाहेर उपचार पद्ध
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, अमरावती येथे वडिलांनी  आपली किडनी देऊन वाचविले मुलाचे प्राण.


सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, अमरावती येथे वडिलांनी  आपली किडनी देऊन वाचविले मुलाचे प्राण.


अमरावती, 23 मे (हिं.स.)

स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ( सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल अमरावती. येथे ७२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर रुग्ण हा काही महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त असल्याने त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती व काही महिन्यांपासून डायलिसिस करत होता . तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबीयास किडनी प्रत्यारोपण विषयी माहिती दिली व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ,अमरावती येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून नव्हे तर इतर राज्यामधून सुद्धा येत असतात याविषयी महिती दिली. तेव्हा रुग्णालयात झालेले ७२ वे किडनी प्रत्यारोपण, हे २२ वर्षीय करण नक्कल बारंगे यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. सदर रुग्ण हा रा. पिंपरी,ता मोर्शी, जि. अमरावती येथील रहिवासी असून मागील काही महिन्यांपासून डायलिसिस चालु होते. मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघुन किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून वडील नक्कल श्रीराम बारंगे (५१) यांनी आपली एक किडनी मुलगा करण ला देण्याचा निर्णय घेतला, व आपली एक किडनी करण ला देऊन त्याला नवीन जीवन दिले.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली.सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ नयन काकडे ,युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ. प्रतिक चिरडे इत्यादींचे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विशेष सहकार्य होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande