
अमरावती, 23 मे (हिं.स.)।
हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेचा हाहा:कार असून अमरावती शहरात गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने घरात थांबलेला जीव असह्य गरमीने कासावीस झाला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात शहरात विविध कारणामुळे तब्बल २५ जणांनी जीव सोडत जगाचा निरोप घेतला आहे. या सर्व मृतदेहावर हिंदू स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू स्मशानभूमीवर साधारणतः दररोज ८ ते १३ डिग अंत्यसंस्कार होतात. मात्र गेल्या दोन दिवसा यामध्ये वाढ झाली असून शुक्रवारला ५४ ते ९५ वयोगटातील सुमारे २५ मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.देशासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरशः होरपळून निघत आहे. राज्यातील अनेक बहरांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा ओलांडला असून, अमरावतीसह विदर्भातील परिस्थिती अधिकच चिताजनक बनली आहे.
हवामान याच पार्श्वभूमीवर विभागाकडून पुढील तीन दिवस अमरावती, अकोला, आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा 'रेड अलर्ट' - जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये तापमान सातत्याने 46 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. त्यामुळे तापत्या उन्हाच्या झाका, असह्य चटके सहन करता करता जीव घामाघुम झाला आहे.
घरातील एसी, कुलर फेल
वृद्ध, रुग्णांचे बेहाल सिमेंटचे रस्ते, उंच इमारती, टिनशेडची घरे आणि डांबरी रस्ते दिवसभर उष्णता शोषून घेतात आणि रात्रीही ती वातावरणात सोडतात. त्यामुळे रात्र झाली तरी उष्णता कायम राहते. दिवसभर सूर्य आग ओकत असल्याने तापमान ४६ अंशाच्या वर गेल्यामुळे घरात लपलेला जीव सुद्धा घामाघुम झाला आहे. यात कडक उष्णतेमुळे घराघरातील फॅन सुद्धा गरम हवा फेकू लागले असून एसी व कुलर सुद्धा फेल झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना जीव एका जाग्यावर थांबणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आबालवृद्ध आणि वयोवृद्धांचे बेहाल झाले असून दिवसभरात शुक्रवारला शहरातील २५ जणांनी या जगाचा निरोप घेतला.हिंदू स्मशान भूमीचे व्यवस्थापक इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारला सर्व ओटे फुल्ल झाले असून रात्री उशिरापर्यंत साधारणतः २५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी त्यांनी दिली.
दररोज ८ ते १३ मृत्यूशहरातील लोकसंख्या पाहता हिंदू स्मशानभूमीवर दररोज सरासरी किमान ८ ते १३ मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे शहरात वयोवृद्धांचाजीवकासावीस झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले असून शुक्रवारला ही संख्या २५ वर पोहोचली आहे.
पुढील ३ दिवस धोक्याचे
उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारच्या वेळी ऊन अधिक तीव्र जाणवत आहे. ग्रामीण भागातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हामुळे नागरिकांना त्रास होत आहे. दुपारच्या वेळेस बाहेर जाणे कठीण झाले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याने आजारी रुग्णांचे प्रमाण वाढत असून वयोवृद्ध व रुग्णांचे बेहाल होत आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सर्वांना काळचे घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात सलग तीन चा दिवस तापमानाचापारा ४५-४६ अंशापर्यंत राहणार असून उष्णतेचारेड अलर्ट कायम असणार आहे. २६ मे नंतरच अमरावतीकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी