पुणे - स्व-गणना करणाऱ्यांनी एसई आयडी गणनाकारांना देण्याचे आवाहन
पुणे, 23 मे, (हिं.स.)। जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सध्या सुरू असून स्व-गणना (Self Enumeration) पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना मिळालेला एसई आयडी (SE ID) संबंधित गणनाकारांना देणे आवश्यक असल्याचे आवाहन पिं
Jan gnagn


पुणे, 23 मे, (हिं.स.)। जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सध्या सुरू असून स्व-गणना (Self Enumeration) पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना मिळालेला एसई आयडी (SE ID) संबंधित गणनाकारांना देणे आवश्यक असल्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.महापालिकेच्या माहितीनुसार, १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणनाकार नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान स्व-गणनेत सादर केलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला एसई आयडी गणनाकारांना उपलब्ध करून द्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गणनाकारांकडून माहितीची पडताळणी व मान्यता मिळाल्यानंतरच ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाणार आहे. नागरिकांनी स्व-गणना पोर्टलवर भरलेली माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात सुरक्षित सरकारी सर्व्हरवर साठवली जात असल्याची माहिती उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी दिली.या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी अफवा किंवा बनावट संकेतस्थळांपासून सावध राहावे. तसेच केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, आयुक्त तथा प्रथम जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनी जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि सुलभ करण्यासाठी गणनाकारांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande