नीट पेपरफुट प्रकरणी पुण्यातून शिक्षीकेला अटक
पुणे, 23 मे (हिं.स.)। देशभरात चर्चेत असलेल्या ‘नीट २०२६’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच
NEET


पुणे, 23 मे (हिं.स.)। देशभरात चर्चेत असलेल्या ‘नीट २०२६’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे.

मनीषा हवालदार या पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत भौतिकशास्त्र विषय शिकवतात. ‘नीट २०२६’ परीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांनी त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. तपासादरम्यान त्यांना भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेची पूर्वकल्पना असल्याचे उघड झाले.सीबीआयच्या माहितीनुसार, हवालदार यांनी एप्रिल महिन्यात आधीच काही प्रश्न माॅडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे यांना दिले होते. विशेष म्हणजे हेच प्रश्न प्रत्यक्ष ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत आढळून आले. या धक्कादायक माहितीनंतर सीबीआयने हवालदार यांना अटक केली.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना यापूर्वीच पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, बिबवेवाडी परिसरातील ब्युटीपार्लर चालक मनीषा वाघमारे हिलाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे सरकत असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande