पीयूष गोयल व्यापारिक संबंधांना चालना देण्यासाठी करणार कॅनडाचा दौरा
नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.)। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल २५ ते २७ मे दरम्यान कॅनडाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते सुमारे १५० उद्योगजगत नेते आणि भारतीय उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील व्
Union Commerce and Industry Minister Piyush Goyal


नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.)। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल २५ ते २७ मे दरम्यान कॅनडाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते सुमारे १५० उद्योगजगत नेते आणि भारतीय उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक मजबूत करणे हा आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, पीयूष गोयल २५ ते २७ मे दरम्यान व्यापारिक संबंधांना चालना देण्यासाठी १५० उद्योग नेत्यांसह कॅनडाला भेट देणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ ओटावा आणि टोरांटो येथे कॅनडाच्या मंत्र्यांसह, उद्योगजगत नेत्यांसह आणि उद्योग संघटनांशी बैठक घेणार आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक तणावामुळे द्विपक्षीय व्यापार चर्चांना आलेली संथगती लक्षात घेता आर्थिक संबंध पुन्हा बळकट करण्याचा हा प्रयत्न आहे.

दरम्यान, गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताला कॅनडासोबत मुक्त व्यापार करार (एफटीए) होण्याची अपेक्षा आहे. या करारात ऊर्जा आणि अत्यावश्यक खनिजे यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असेल, तसेच भारतीय वस्त्रोद्योग आणि चामड्याच्या कंपन्यांसाठीही संधी निर्माण होतील. या दौऱ्यात तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, स्वच्छ ऊर्जा आणि अत्यावश्यक खनिजे या क्षेत्रांतील सहकार्यावर मुख्य भर दिला जाणार आहे.

विशेष म्हणजे, मार्च महिन्यात पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान दोन्ही देश व्यापक आर्थिक भागीदारी करारावर चर्चा करण्यासाठी अटी अंतिम करण्यास सहमत झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande