नांदेडमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
नांदेड, 23 मे (हिं.स.)। महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडले. यावेळी जिल
नांदेडमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न


नांदेड, 23 मे (हिं.स.)।

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील सोपविलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये अधिक काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

प्रशिक्षणावेळी अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनमंत कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.

निवडणूक कामकाज अधिक सुलभ व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रशिक्षण व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, नामनिर्देशन, आचारसंहिता, माहिती व्यवस्थापन, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, मतदार यादी व मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्रिका छपाई व वाटप, स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थापन, उमेदवार व राजकीय पक्ष निवडणूक खर्च तपासणी व नियंत्रण, जिल्हास्तरीय कक्ष, निवडणूक निरीक्षक कक्ष, वाहन अधिग्रहण व वाहतूक व्यवस्थापन, मतपेटी व मतदान साहित्य वाटप तसेच संगणकीकरण व्यवस्थापन आदी कक्षांचा समावेश आहे.सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित जबाबदाऱ्या व कर्तव्ये सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी विविध कक्ष तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाज व जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande