मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्त्यांना पुरस्काराचे श्रेय - नरेश म्हस्के
नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.)। -शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला जाहिर झाला आ
Mhaske


नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.)। -शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला जाहिर झाला आहे. मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्त्यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत आहे, असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्यांवर तसेच अर्थसंकल्पावर, सरकारच्या धोरणांवर बाजू भक्कमपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे, विविध विभागांवर प्रश्नोत्तरे विचारणारे, संसदेतील उपस्थितीत अव्वल असणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा `संसद रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना पहिला `संसद रत्न' मागील वर्षी पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी देखील सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण आणि धडाकेबाज भाषणांनी विरोधकांची झोप उडविणारे खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनाही दुसऱ्यांदा 'संसद रत्न ' पुरस्कार जाहीर झाला आहे.

संसद रत्न पुरस्कारांचा १६ वा सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार असून, यावेळी १५० वा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राइम पॉइंट फॉऊंडेशनचे श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केली. “संसद रत्न पुरस्कार २०२६ साठी परीक्षक समितीने १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. यावर्षी आम्ही १५० वा पुरस्कार प्रदान करणार आहोत,” अशी माहिती संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी राहुल यांनी दिली.

“वैयक्तिक श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशचे जगदंबिका पाल, राजस्थानचे पी. पी. चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे,” असेही त्यांनी सांगितले. “याशिवाय उत्तर प्रदेशचे प्रवीण पटेल, झारखंडचे बिद्युत बरन महातो, राजस्थानचे लुम्बाराम चौधरी, महाराष्ट्राचे नरेश गणपत म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, स्मिता उदय वाघ, डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी आणि गुजरातचे नरहरी अमीन यांचीही निवड करण्यात आली आहे.

संसदेत बजेट अधिवेशन २०२६ अखेरपर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे विविध श्रेणींमध्ये त्यांना गौरविण्यात येणार आहे,” असे प्रियांदर्शनी राहुल यांनी नमूद केले.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल चार संसदीय समित्यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

चेन्नईस्थित प्राईम पॉईंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने २०१० मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार संसद रत्न पुरस्काराची स्थापना केली होती. पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन स्वतः डॉ. कलाम यांनी केले होते. “प्राइम पॉईंट फाउंडेशनने नुकताच आपला २५ वा वर्धापन दिन साजरा केला आहे,” अशी माहिती संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच संसद रत्न पुरस्कारांचे संस्थापक श्रीनिवासन यांनी दिली.

“ज्येष्ठ पुरस्कारप्राप्त संसद सदस्य, निवृत्त घटनात्मक अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मान्यवर परीक्षक समितीद्वारे विजेत्यांची निवड केली जाते. खासदार आणि समित्यांच्या संसदीय कामगिरीच्या आकडेवारीच्या आधारे निवड केली जाते. ही माहिती पी आर एस लेजिस्लेटिव्ह रिसर्च, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांकडून उपलब्ध करून दिली जाते,” असेही श्रीनिवासन यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande