मोदी सरकार पडण्याच्या वक्तव्यावरून भाजपची राहुल गांधींवर टीका
नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.)। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुढील एका वर्षात मोदी सरकार पडणार असल्याच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला देशात अराजकत
राहुल गांधी पीयुष गोयल


नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.)। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुढील एका वर्षात मोदी सरकार पडणार असल्याच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला देशात अराजकता पसरवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे.

पीयूष गोयल म्हणाले की, राहुल गांधी यांचे हे वक्तव्य देशाविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या कथित टूलकिट अजेंड्याकडे निर्देश करते. त्यांनी आरोप केला की, काँग्रेसला लोकशाही मार्गाने भाजपचा पराभव करता येत नसल्याने आता देशात अस्थिरता आणि अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेच्या मनातून हटवणे शक्य नाही आणि जनता काँग्रेसचे राजकारण चांगल्या प्रकारे समजून आहे.

भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसेन यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी हे समजून घेतले पाहिजे की, हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार आहे. पंतप्रधान मोदी देशाच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस काम करत आहेत आणि राहुल गांधी यापूर्वीही अनेक मोठे दावे करत आले आहेत, मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. शाहनवाज यांनी म्हटले की, अशा प्रकारची भाषा देशहिताची नाही.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांनी म्हटले की, काही नेते विदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत देशाविरोधात दुष्प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने आपली विचारधारा आणि ओळख यांच्याशी तडजोड केली आहे.

केंद्रीय मंत्री सुकांता मजूमदार यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला महत्त्वहीन ठरवत म्हटले की, राहुल गांधी कधी काय बोलतील, हे त्यांच्या पक्षातील लोकांनाही माहीत नसते.

उल्लेखनीय आहे की, काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पुढील एका वर्षात मोदी सरकार पडेल आणि देशातील वाढता आर्थिक असंतोष हे त्यामागील मोठे कारण असेल, असे म्हटले होते. बैठकीत काँग्रेस नेते इमरान मसूद यांनीही मुस्लिम मतदारांपर्यंत पक्षाचे कामकाज आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर दिला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande